बोपदेव घाटात चार अज्ञातांनी एकास चाकूच्या धाकाने लुटले
Raju Tapal
January 17, 2022
40
बोपदेव घाटात चार अज्ञातांनी एकास चाकूच्या धाकाने लुटले
बोपदेव घाटात चार अज्ञातांनी एकास चाकूच्या धाकाने ६ हजार ५०० रूपयांचे तीन मोबाईल व १ हजार रूपये लुटून नेणा-या चौघांवर कोंढवा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रामा थापा वय - २२ रा. मिठानगर कोंढवा खुर्द पुणे यांनी याबाबत कोंढवा पोलीसांत फिर्याद दिली.
फिर्यादी रामा थापा सिक्युरिटी गार्डचे काम करत असून चुलतभाऊ अमन थापा वय -१८ व त्याचा मित्र सुरेंद्र थापा याच्यासह मोटरसायकलवरून बोपदेव घाटातून सासवड रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी भाऊ व त्याच्या मित्राला चाकूच्या धाकाने तीन मोबाईल व एक हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण सहा हजार पाचशे रूपयांचा ऐवज लूटून पोबारा केला.
कोंढवा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट पुढील तपास करत आहेत.
Share This