बोपदेव घाटात थांबलेल्या व्यक्तींना धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून जबरदस्तीने लुटणा-या आरोपींना कोंढवा पोलीसांनी अटक केली.
आदित्य रवि माने वय - १८ वर्षे रा.पापळवस्ती बिबवेवाडी पुणे, अशोक माणिक काळे वय १८ रा.गणपतनगर, पापळवस्ती, बिबवेवाडी पुणे यांना अटक करून ४ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
फिर्यादी विक्रांत गुरूदेव गारगोटे वय - २७ वर्षे रा.आनंद सोसायटी ,पाटील इस्टेट,वाडा रोड, राजगुरूनगर जि.पुणे हे त्यांचा मित्र निखिल निवृत्ती सातारकर यांच्यासह गप्पा मारत बसले होते. त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या ४ ते ५ आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला धारदार कोयते दाखवून तूच विकी मोरे आहे का ? असे विचारून कोयता उगारला. सदर कोयता फिर्यादी यांच्या बोटाला लागल्याने फिर्यादी यांच्या मित्राने घाबरून आधारकार्ड दाखविण्याकरिता पाकीट बाहेर काढले असता आरोपी पाकीट हिसकावून पळून गेले.
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे पुढील तपास करत आहेत.