अमरावती जिल्हातील शिक्षक समायोजन प्रक्रीया रद्द करा
जिल्हातील प्राथमिक शिक्षक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन अमरावती जिल्हा परीषद मध्ये कार्यरत शिक्षकांचे १५मार्च २०२४च्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे शेकडो शिक्षक अतिरीक्त होत आहे.त्यांचे समायोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांचे तालुक्यात अतिरीक्त झालेल्या शिक्षकांचे २८तारखे पर्यंत समायोजन व जिल्हास्तरावरचे अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन ५डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.ही समायोजन प्रक्रीया रद्द करण्याची मागणी मंगळवार दि.२५डिसेंबरला प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदना व्दारे केली आहे. या मध्ये संच मान्यता शासन निर्णय 15/3/2024 नुसार मुद्दा क्रमांक 1.1 नुसार 16 पटसंखेला दुसरा शिक्षक मान्य करावा असं म्हटलं आहे,त्यानुसार मान्य करावा. मुद्दा क्रमांक 1.4 नुसार दुसरा विषय शिक्षक मान्य होईल,असं असं शासननिर्णय सांगतो त्यानुसार मान्य व्हावा. मुख्याध्यापक पद 100 पटसंख्येवर मान्य करण्याच्या संदर्भातल शुद्धिपत्रक आलेल आहे. त्याप्रमाणे मुख्याध्यापक पद मान्य करावं. 30 सप्टेंबर 2025 च्या पटसंख्येवर समायोजन केल्यास अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भाषा विषय शिक्षक,सहाय्यक शिक्षक देऊन शिक्षकांवरील अन्याय दूर करून विद्यार्थ्यांना न्याय देता येऊ शकतो. त्यामुळे संच मान्यते करिता 30 सप्टेंबर 2025 ची पटसंख्या ग्राह्य धरावी. वरील मुद्द्यांचा विचार करून समायोजन प्रक्रिया व्हावी,तसेच ज्या पदांचे समुपदेशन त्याच पदाची सेवाजेष्ठता विचारात घ्यावी वेतन श्रेणी लागू असलेल्या विषय शिक्षकांना समुपदेशनात प्रथम प्राधान्य देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदनयाकरिता दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी मा,CEO,मा. EO जिल्हा परिषद अमरावती यांना संघटनेच निवेदन देण्यात आले आहे आणि अमरावती जिल्ह्यातील अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळावा,अशी मागणी शिक्षक संघटनेचे सुरेंद्र मेटे,मंगेश खेरडे,धनराज कांदे,मनोज चौरपगार,राजेश गाडे,प्रफुल्ल खोपे,गजानन देवके,राजाभाऊ राजनकर,चंद्रशेखर रामटेके,राजेन्द्र गावंडे,गणेश जोशी,अजयानंद पवार,विनोद वानखेडे,शरद काळे,अमोल क्हेकर,नितिन देशमुख,सत्येंदु अभ्यंकर,रामेश्वर स्वर्गीय,किशोर मालोकार,गोकुल चारथळ,नितीन पेढेकर,वसीम फरहत,जावेद इकबाल,शैलेंद्र दहातोंडे,शेख शकील,उमेश वाघ,मनिष काळे राजेंद्र दिक्षित यांनी केली आहे असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.