माध्यमिक शिक्षकांचे क्षमतावृध्दीचे प्रशिक्षण संपन्न
अमरावती,ता.२३ :- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात विविध टप्यावर करण्यात येत आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये हे धोरण पूर्णपणे लागू करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती तसेच पंचायत सामिती भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने ५ दिवसीय तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणचा चौथा टप्पा दिनांक १८ ते २२ मार्च दरम्यान जि.प.माध्यमिक कन्या शाळा कॅम्प अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता.
तालुकास्तरीय प्रशिक्षणात ८ तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तालुक्यातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक अशा ऐकून १०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थिना प्रशिक्षण देले . यात जिल्हा परिषदेचे व खासगी माध्यमिक शिक्षकांचा समावेश होता. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी हे तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील महत्वाचे बदल पोहोचविण्याचे काम केले जात आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन आराखडा, क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनिती, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती कौशल्ये, विचार प्रवर्तक प्रश्न, समग्र प्रगतीपत्रक इत्यादी विषयावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी दिपकजी कोकतरे साहेब यांच्या मार्गदर्शनात चंद्रकांत कडबे हे या प्रशिक्षणाची समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
तालुकास्तरीय प्रशिक्षणात पंकज हिरोडे, श्वेता पांडे, सुनिल ढोणे, संजय गेडाम, राजेन्द्र ढाकरे , भावना खांडे, संदिप भटकर, निलेश चाफलेकर यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडली.