• Total Visitor ( 84855 )

कारने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू

Raju Tapal November 04, 2021 44

कारने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; चारजण जखमी 

 

पुण्याहून सोलापूरकडे जाणा-या कारने  सोलापूरकडेच जाणा-या दोन दुचाकींना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चारजण जखमी झाले.

गुरूवरी दि.4/11/2021 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सावळेश्वर टोलनाक्यावर हा अपघात झाला.ता

अपघातातील मृत तरूण पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथील असून नाव समजू शकले नाही.

मोहोळहून  एम एच १३ बी एस ३१६३ या क्रमांकाच्या दुचाकीवर सोलापूरकडे निघालेले दुचाकीस्वार अचानकपणे रस्त्याच्या मधोमध आले. त्यानंतर मागून आलेल्या कारचालकाला त्यांंचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने जाणा-या एम एच 12 एस यू 8983 या क्रमांकाच्या कारने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील दोन्ही एअरबॅग्ज ओपन झाल्या होत्या. कारमधील एकाला किरकोळ दुखापत झाली असून दुस-या दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले. 

दुचाकीवरील एका महिलेच्या पायाला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले. 

हा अपघात नेमका पुलावर झाल्याने सोलापूर पुणे महामार्गावर सावळेश्वर टोलनाक्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. 

अपघातानंतर सावळेश्वर टोलनाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलला पाठविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक आय एस सय्यद यांनी अपघात झालेली वाहने बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करून दिला.पुण्याहून दिवाळीचे फराळ घेवून  चारचाकीतील दोन तरूण सोलापूरकडे जात होते. घरापासून १८ ते २० किलोमीटर अंतरावर असतानाच हा अपघात झाला. टोमॅटो, लसूण,घरगुती  भाजीपाला  घेवून जाणा-या दुचाकीस्वाराचा या अपघातात वाटेतच अंत झाला. मोहोळ पोलीस या अपघाताबाबत तपास करीत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement