टिटवाळा न्यूज कार्यालयात पत्रकार दिन साजरा
राजू टपाल.
टिटवाळा :- मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या "दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर" यांची आज जयंती त्यानिमित्ताने
टिटवाळा न्यूज कार्यालयात पत्रकार दिन साजरा करून
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
झुकणार नाही, वाकणार नाही. हात कधीही थरथरणार नाही. लबाडांच्या लबाड्या उघड करताना सत्याची कास धरताना अन् उपेक्षित-वंचितांचे प्रश्न मांडताना कधी डगमगणार नाही...! प्रस्थापितांच्या जुलूमशाहीला सत्यच सांगेल, सत्यच बोलेल, सत्यच लिहिल, झाले कितीही आघात अन् वार तरी लेखणी करेल प्रहार ध्येयापासून विचलित होणार नाही. सामाजिक बांधिलकीच्या ऋणानुबंधाचा अंकुर फुलवताना अन् जपताना घडवेल आणखीन पत्रकार.
सदर वेळी टिटवाळा न्यूज चे संपादक राजू टपाल,वृत्त निवेदिका श्रद्धा टपाल,व्हिडीओ एडिटर क्षितिज टपाल,समिक्षा भागरे,श्वेता गोंधे, तनुजा भोईर इत्यादीनी अभिवादन केले.