• Total Visitor ( 368860 )
News photo

कोंढापुरी येथील चंपाषष्ठी महोत्सवाचा समारोप 

Raju tapal November 28, 2025 52

कोंढापुरी येथील चंपाषष्ठी महोत्सवाचा समारोप 



शिरूर :- तालुक्यातील कोंढापुरी येथील शिवमल्हार सेवा ट्रस्टच्या वतीने मल्हार गडावर आयोजित केलेल्या चंपाषष्ठी महोत्सवाचा समारोप बुधवार दि.२६ नोव्हेंबरला झाला. कोंढापुरी येथील शिवमल्हार सेवा ट्रस्टच्या वतीने मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा  शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर २०२५ पासून मल्हारगडावर मार्तंड भैरव षड् रात्रौत्सव,चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या ६ दिवसांपासून आयोजित केलेल्या चंपाषष्ठी महोत्सवात दररोज सकाळी ७ ते १० यावेळेत खंडोबा चरित्र पारायण वाचण्यात आले.सकाळी ८ तसेच रात्री ८ वाजता खंडोबा देवाची आरती करण्यात आली . सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत जागरण गोंधळ कार्यक्रम पार पडला. रात्री ९ ते ११ यावेळेत संगीत भजनाचा तसेच हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी दि.२१ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता अभिषेक करून कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. पादुका मंदीर येथे घटस्थापना करण्यात आली होती.शुक्रवारी दि.२१ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता उत्सवमूर्तीचे मिरवणूकीने खंडोबा मंदीराकडे प्रस्थान झाले. सकाळी ९ वाजता खंडोबा मंदिर येथे घटस्थापना करण्यात आली होती. सायंकाळी ५ नंतर बेल्हे‌ ता‌.जुन्नर येथील तानाजी‌ माळवदकर सह रामदास गुंड तुरेवाले यांचा कलगीतु-याचा कार्यक्रम पार पडला. शनिवार दि.२२ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता श्री.स्वामी समर्थ प्रस्तूत मल्हारी महात्म्य,बानू खंडोबा विवाहसोहळा पार पडला. सोमवार दि.२४ नोव्हेंबरला दुपारी ३ नंतर प्राध्यापक वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान पार पडले. सायंकाळी ७ नंतर किर्तनकार ह.भ.प.प्रकाशमहाराज साठे यांचे कीर्तन पार पडले. किर्तन ऐकण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवार दि.२५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ नंतर युवा शाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोकगाणी‌ तसेच पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. बुधवार दि‌.२६ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता घट हलविल्यानंतर आरती करण्यात आली. सकाळी १० वाजल्यानंतर नगर रोड पासून देवाचा साखरपुडा मिरवणूक काढण्यात आली होती.दुपारी ४ नंतर पांडुरंग मंदीरापासून देवाच्या पालखीची मोठी मिरवणूक संबळ,ताशा वादक साहिल नवगिरे  यांच्या साथीत काढण्यात आली होती.युवराज गायकवाड पाचगावकर यांचा हलगीचा कार्यक्रम पार पडला. कोंढापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा ढोल लेझीम खेळ तसेच धनगरी खेळही मिरवणूकीत पार पडला. दुपारी १२ नंतर हळद फोडून घाणा घालण्यात आला.त्यानंतर हळद लावून बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ६ नंतर माहेरवाशिणींची ओटी भरण्यात आली.सायंकाळी ७ नंतर देवाचा लग्नसोहळा ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत पार पडला .वांग्याचं भरीत तसेच आणे ता.जुन्नर येथील कोंडीबा दाते यांनी बनविलेल्या आमटी व भाकरीच्या महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मल्हारगडावर खेळणी विक्रेत्यांनीही दुकाने थाटली होती. कोंढापुरी गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. बाबाजी थोरात,गुजाबा थोरात,अतुल पुणेकर,भाऊसाहेब थोरात,जयराम होलगुंडे,माणिकराव रामचंद्र गायकवाड,सुनील साहेबराव गायकवाड,माजी उपसरपंच आशिषशेठ गायकवाड,माणिकराव सोपानराव गायकवाड,कुंडलिक खंडू गायकवाड,दीपक ज्ञानेश्वर गायकवाड,विठ्ठल रामराव गायकवाड,राजेंद्र बाजीराव गायकवाड,शाहीर वामनराव गायकवाड,बापूराव दादाभाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमात अन्नदान केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिव मल्हार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निळूभाऊ गायकवाड,माजी उपसरपंच आशिषशेठ गायकवाड,माजी उपसरपंच अर्जूनराव गायकवाड, समरजित गायकवाड,अशोकराव ससे,रूपेश बळवंतराव गायकवाड सतिश फक्कडराव गायकवाड,रामदास सर्जेराव गायकवाड, विलासराव चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement