भोरच्या राजकारणातील चाणक्य, धुरंदर व्यक्तिमत्व हरपले ;
भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे यांच्या निधनाबद्दल सरपंच परिषदेचे भोर तालुकाध्यक्ष विजयराव गरूड यांची प्रतिक्रिया
शिरूर :- भोरच्या राजकारणातील चाणक्य, धुरंदर व्यक्तिमत्व हरपले अशी प्रतिक्रिया भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक उर्फ बाळासाहेब थोपटे यांच्या निधनाबद्दल सरपंच परिषदेचे भोर तालुकाध्यक्ष विजयराव मुगुटराव गरूड यांनी व्यक्त केली आहे.
भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक उर्फ बाळासाहेब विठ्ठलराव थोपटे यांचे हातनोशी ता.भोर येथे राहात्या घरी ह्रदय विकाराने नुकतेच निधन झाले.
त्यांचे वय - ७१ वर्षांचे होते. बाळासाहेब थोपटे काॅंग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते.
राजगड ज्ञानपीठाचे विश्वस्त, रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे सचिव होते. सामाजिक, राजकीय,सहकार क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
काॅंग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्यातील नेते,माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे ते पुतणे,भोर तालुक्याचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचे ते चुलत बंधू होते. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध मातोश्री,दोन विवाहीत मुली,सुना,नातवंडे दोन बंधू असा परिवार आहे.
भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक उर्फ बाळासाहेब थोपटे यांच्या निधनाबद्दल टिटवाळा न्यूज ला प्रतिक्रिया देताना भोर तालुका सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष विजयराव गरूड म्हणाले, बाळासाहेब थोपटे यांनी राजकीय क्षेत्रात भोर तालुका पंचायत समितीचे सभापती,पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ कात्रज चे संचालक, राजगड ज्ञानपीठ संकुल विश्वस्त अशी अनेक पदे भुषविली होती. बाळासाहेब थोपटे भोरच्या राजकारणातील चाणक्य, धुरंदर व्यक्तिमत्व होते. भोर,वेल्हा तालुक्यातील प्रत्येक गावाची राजकीय, सामाजिक, परिपूर्ण माहिती असणारे , संपूर्ण पुणे, सातारा जिल्ह्यात परिचित होते.गुडघ्याचे आॅपरेशन , बायपास सर्जरी होवूनही प्रत्येक व्यक्तीच्या सुखदु:खात सामील होणारा,जिद्द चिकाटी असणारे,अनंतराव थोपटे साहेब, संग्रामदादा थोपटे यांच्या निवडणुकीचे पूर्व नियोजन करणारे व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या जाण्यामुळे थोपटे घराण्याबरोबरच भोर तालुक्याचे मोठे नुकसान झाले. सर्व कार्यकर्ते हतबल, नाराज झालेले असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच भोर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तसेच भांबवडे ग्रामस्थांच्या वतीने प्रार्थना.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे.)