चांदूस येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणारे दोघे खेड पोलिसांकडून जेरबंद
खेड तालुक्यातील चांदूस येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणा-या दोघांना खेड पोलीसांनी जेरबंद केले.
महेश दत्तात्रय मंगळवेढेकर वय - १९ रा.सुलतानपूर मंचर ता.आंबेगाव, चंद्रशेखर उर्फ राहूल शिवाजी राजगुरू वय - २४ रा.इंदिरानगर मंचर ता.आंबेगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपींकडून सोन्याचे दागिने पोलीसांनी हस्तगत केले.
साधना अंकूश कारले या राहात्या घराला कुलूप लावून माहेरी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्याने त्यांच्या दिराच्या घरचा पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील ८२. ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १० हजार असा एकूण २ लाख ९३ हजार ४४० रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत कारले यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला होता.
चोरी केलेले सोन्याचे दागिने भांबोली ता.खेड येथे ठेवल्याचे सांगितले.सोन्याचे दागिने आरोपींकडून पोलीसांनी जप्त केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.