• Total Visitor ( 133141 )

चासकमान कालव्यासाठी ३०० कोटीची मागणी

Raju tapal October 11, 2021 43

चासकमान  कालव्याच्या अस्तरीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार अशोक पवार यांची ३०० कोटी रूपयांची  मागणी

             ---------------

चासकमान प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणा-या शेतक-यांना हेड टू टेल सिंचनासाठी पूर्ण  क्षमतेने पाणी मिळण्यासाठी कालव्याचे अस्तरीकरण होणे गरजेचे असल्याने ३०० कोटी रूपयांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याचे शिरूर हवेलीचे आमदार ऍड.अशोकबापू पवार यांनी सांगितले. 

 १० कोटी रूपये खर्चाच्या चासकमान डावा कालवा अस्तरीकरण  कामाच्या प्रारंभाप्रसंगी शिरूर तालुक्यातील आंबळे येथे  आमदार अशोक पवार बोलत होते.

 जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र जगदाळे अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रविबापू काळे, शिरूर बाजार समितीचे सभापती ऍड.वसंतराव कोरेकर, चासकमानचे उपअभियंता आर जे भावसार, शाखा अभियंता राजेंद्र गोरे,सरपंच सोमनाथ बेंद्रे, प्रकाश बेंद्रे, दादासाहेब चव्हाण, बाळासाहेब वाघचौरे, तात्या काळे, अशोक कोळपे , सागरराजे निंबाळकर, प्रा.भाऊसाहेब भोसले, विलासराव बेंद्रे, न्हावरेच्या सरपंच अलका शेंडगे, अतुल बेंद्रे, उपसरपंच सुनिता जाधव, गोरक्ष बेंद्रे, प्रवीण दौंडकर, दीपक बेंद्रे कार्यक्रमास उपस्थित होते.

कालव्याची दुरवस्था असल्याने कालव्यातून ९५० क्यूसेसने पाणी सोडण्याऐवजी फक्त ५५० क्युसैसने पाणी सोडावे लागते.गळती होत असल्यामुळे टेलच्या बाजुला फक्त १०० क्युसेसने पाणी येते. यामध्ये शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे चासकमान कालवा अस्तरीकरणासाठी ३०० कोटी रूपयांची मागणी केली असल्याचे आमदार ,ऍड.पवार यांनी यावेळी सांगितले.

Share This

titwala-news

Advertisement