• Total Visitor ( 133937 )

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Raju Tapal February 17, 2023 107

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

राजू टपाल.

टिटवाळा :- संभाजी ब्रिगेड आयोजित तसेच रेड स्वस्तिक व आम्हीं मांडेकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत महाआरोग्य शिबिर 19 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्राबाई निवास, जय मल्हार चौक, मांडा कोळीवाडा पश्चिम येथे सकाळी 10.30 ते 3 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.

सदरील आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हिमोग्लोबिन तपासणी, दंत तपासणी, ईसीजी, एचआयव्ही तपासणी,रक्तातील साखरेचे प्रमाण मधुमेह,मूत्रपिंड,रक्तदाब, (बीपी), हृदयरोग, सांधे व फुफुसांचे आजार, अस्थमा (दमा), मान पाठ व कंबर दुखणे, हाडांचे आजार, मूत्रमार्ग विकार,मुतखडा, बालकांची तपासणी, कान, नाक, घसा तपासणी इत्यादी आजारांवर तपासणी व महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येतील तसेच विशेष उपक्रम अल्पदरात आयुष्मान भारत कार्ड( पाच लाख पर्यंत वैद्यकीय उपचार मोफत ), ई श्रम कार्ड, आधार कार्ड ( स्मार्ट कार्ड ) आरोग्य शिबिरामध्ये एका दिवसांत काढून देण्यात येतील.

सदरील शिबिरात  एम्स हॉस्पिटल डोंबिवली, कार्डियाक केअर सेंटर, डायबेटिज हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, स्टार डोळ्यांचे हॉस्पिटल, इलायिट डेंटल क्लिनिक, अल्केम लाईफ कंपनी या नामांकित हॉस्पिटल्सचा सहभाग लाभणार आहे.                   

सदरील शिबिरास विशेष सहकार्य म्हणून ग्रामस्थ मंडळ मांडा, जय मल्हार मंडळ मांडा, साई आश्रय मंडळ, टार्गेट ट्रेडिंग शेअर मार्केट क्लासेस, गंधर्व गुरुकुल यांचे लाभले आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर हे राहणार आहेत. तरी या सुविधा शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रभाकर भोईर यांनी केलेले आहे.

--------------------------------------

Share This

titwala-news

Advertisement