छत्रपती संभाजीमहाराज यांच्या बलिदान स्मरणदिनानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान धारक-यांच्या वतीने कोंढापुरीत मुकपदयात्रेचे आयोजन
-------------------
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या़च्या ३३३ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान धारक-यांच्या वतीने शुक्रवार दि. १ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ नंतर मुकपदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
मुकपदयात्रेचे नेतृत्व अतुल सुनिलराव गायकवाड व ज्ञानेश्वर राजेंद्र गायकवाड यांनी केले.
कोंढापुरी येथील ग्रामपंचायत कार्यालय पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात टिटवाळा न्यूज,मराठी १ न्यूजचे पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री.विजयराव ढमढेरे यांच्या हस्ते थर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे ,पुतळ्याचे पुजन करण्यात आले.
सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय, आर एम धारिवाल सिंहगड इन्स्टिट्यूट रस्ता, गणेगाव खालसा गावाकडे जाणारा रस्ता, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, हनुमंत मंदीर ,गावचे प्रवेशद्वार ,ग्रामपंचायत कार्यालय चौक अशी मुकपदयात्रा काढण्यात आली.
रूपेश ढमढेरे, सतिश दत्तात्रय गायकवाड, ज्ञानोबा दूधाटे, शुभम गायकवाड, दर्शन सोनवणे, नवनाथ बापुराव गायकवाड, अमित गायकवाड, सचिन गायकवाड, कुणाल गायकवाड, अक्षय गायकवाड, नागेश यादव, अजित गायकवाड, तेजस गायकवाड, ओम गुजर, ओंकार गायकवाड, कृष्णा गायकवाड, ऋतिक गायकवाड हे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान चे धारकरी मुकपदयात्रेत सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कार्यालय पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात प्रेरणामंत्र, ध्येय मंत्र , प्रतिज्ञा, श्री संभाजी सूर्य हृदय श्लोक म्हणण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सकाळी शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजीमहाराज यांच्या समाधीस्थळी झालेल्या मुख्य कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोंढापुरी येथील धारकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. वढू बुद्रूक येथून धारकरी कार्यकर्त्यांनी कोंढापुरी येथे शिवज्योत आणली. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात सायंकाळी ६ नंतर झालेल्या कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अतुल सुनीलराव गायकवाड यांनी सांगितले , संभाजी महाराजांचे मराठा साम्राज्यावरती,हिंदू धर्मावरती मोठे उपकार आहेत.संभाजी महाराजांनी हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, मराठी संस्कृती, आपला देश आपली माती आपली संस्कृती यासाठी सोसले. आपल्या प्राणांचा त्याग केला पण धर्मबदल केला नाही असे सांगितले.
ज्ञानेश्वर राजेंद्र गायकवाड या धारक-याने यावेळी बोलताना सांगितले, छत्रपती संभाजी महाराज गेले हा मराठी समाजासाठी काळा दिवस आहे. जगाच्या पाठीवर एकमेव राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज.
३४ वर्षांत महाराजांनी लढायला शिकविले,जगायला शिकविले,मरायला शिकविले कवि कलश पहिल्यापासून महाराजांच्या सोबत होते.मरताना सुद्धा सोबत होते असे सांगितले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर