चिखली,मोशी भंगार व्यावसायिकांना शिक्रापूर परिसरात बंदी
शिरूर :- चिखली,मोशी येथील भंगार व्यावसायिकांना शिक्रापूर परिसरात व्यवसाय करण्यास शिक्रापूर ग्रामपंचायतीने बंदी घातली आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश बबनराव गडदे, उपसरपंच पुजा दिपक भुजबळ यांनी शिक्रापूर ग्रामस्थांना सुचनेद्वारे कळविले आहे की, चिखली,मोशी येथील भंगार,स्क्रॅप दुकानांना आपल्या शिक्रापूर परिसरात कोणीही जागा विकत किंवा भाड्याने देवू नयेत. जेणेकरून भविष्यात आपल्याला त्रास होईल.
अशा त्रासदायक व्यवसायास ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारची परवानगी देणार नाही याची नोंद घ्यावी असे सुचनेद्वारे म्हटले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे