• Total Visitor ( 85007 )

चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट विकणा-या टोळीतील पाच जणांना अटक ; लातूर ,देवणी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांची कारवाई

Raju Tapal November 22, 2021 47

पळविलेल्या मोटरसायकलींचे सुट्टे पार्ट काढून इतरांना विक्री करणा-या मेकॅनिक ट़ोळीतील चार तसेच एका मोटरसायकल चोरट्याला अटक करण्याची कार्यवाही लातूर,देवणी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी केली.

याबाबत देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

देवणी तालुक्यातील वलांडी येथे एका गॅरेजमध्ये चोरीच्या मोटरसायकलींच्या सुट्या पार्टची विक्री परस्पर विल्हेवाट लावली जाते या खब-यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वलांडी येथे गॅरेजवर छापा टाकला. गॅरेजमधील सुटे स्पेअर पार्ट जप्त केले. यावेळी सिराज चाँदपाशा बावडीवाले वय २५ रा.वलांडी ता.देवणी, संगमेश्वर तुकाराम पुंडे वय - २५ रा.मानकेश्वर ता.भालकी जि.बिदर , कृष्णा पुंडलिक कांबळे वय - २४ रा.बेंबळी ता.देवणी ,नानासाहेब विश्वनाथ गायकवाड वय २७ रा. चवणहिप्परगा ता.देवणी या चौघा मेकॅनिकला ताब्यात घेतले. 

दशरथ यादव सूर्यवंशी रा.हेळंब ता.देवणी हा चोरीच्या मोटरसायकली घेवून येतो. आम्हाला फोन करून हेळंब येथे बोलावून घेत त्या मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट वेगळे करायला सांगतो. हे स्पेअरपार्ट आम्ही दुस-या जुन्या मोटरसायकलधारकांना गरजेप्रमाणे विक्री करतो अशी माहिती दिली. यानंतर दशरथ सूर्यवंशी याला हेळंब गावातून अटक केली.

तीन मोटरसायकली ,स्पेअर पार्ट चासी  असा एकूण १ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बहुरे, बिलापट्टे, म्सस्के, देवकाते, शेख, पाटील,कांबळे, अंगद कोतवाड या पोलीस पथकाने केली.

Share This

titwala-news

Advertisement