११ चोरीच्या मोटरसायकलसह खरेदी विक्री करणा-या पाच आरोपींना लातूर एम आय डी सी पोलीसांनी गुरूवारी अटक केली.
संतोष सोपान माने वय - २४ रा.लोदगा ता. औसा अंकुश राम कांबळे वय - ३० रा.ओसवाडी ता. लातूर ,शेख सिद्दीम खय्यूम रा.सपकाळनगर लातूर ,लक्ष्मण मनोहर कांबळे रा.सपकाळनगर ,लातूर , आदिल उस्मान कुरेशी रा.हत्तेनगर लातूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपींकडून ६ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लातूर एम आय डी सी पोलीस पथकाला मोटरसायकल चोरी करणारे रिंग रोड वरील एका धाब्यावर जेवणासाठी येणार असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीवरून सापळा लावण्यात आला. या सापळ्यात दोन जण अडकले. त्यांना विश्वासात घेवून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी संतोष सोपान माने, अंकुश राम कांबळे स्वत:ची नावे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे दुचाकी चोरीची विचारपूस केली असता लातूरसह अन्य शहरातून मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. चोरलेल्या मोटरसायकली लातूर शहरातील विविध लोकांना विक्री केल्याचे कबूल केले.

शेख सिद्दीक खय्यूम , लक्ष्मण मनोहर कांबळे , आदिल उस्मान कुरेशी यांनी केल्याचे सांगितले. त्यावरून पाचजणांकडून एम आय डी सी पोलीस ठाण्यात तीन, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक अशा चार गुन्ह्यांत ६ लाख ७० हजार रूपये किंमतीच्या ११ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड पोलीस अंमलदार बेल्लाळे,अर्जून राजपूत ,प्रशांत ओगले ,मुन्ना मदने आदींनी परिश्रम घेतले.