नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांचे स्वच्छता अभियान
रत्नागिरी :- नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानात १५०० सदस्यांनी सहभाग घेतला. त्यांनी ७०८ किलो ओला, तर १७ हजार १३७ किलो सुका कचरा सुमारे तीन तासाच्या अभियानात संकलित केला.
महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा, अलिबाग) सदस्यांनी रत्नागिरी शहर परिसर चकाचक केला. स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो कचरा संकलित केला. तो कचरा नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आला. रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव ते आरटीओ ऑफिस, त्यानंतर एसटी स्टॅंड, राम आळी, पऱ्याची आळी, गाडीतळ, कॉंग्रेस भवन नाका, टिळक आळी, आठवडा बाजार, प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसर या सर्व भागामध्ये कचरा गोळा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता सदस्यांनी हाती झाडू घेऊन कामाला सुरवात केली. सदस्यांना हातमोजे, मास्क देण्यात आले होते. ओला कचरा, सुका कचरा गोळा करायला सुरवात केली. साधारण १० वाजेपर्यंत ही सफाई मोहीम सुरू होती. आज देशभरात सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवले. रत्नागिरी तालुक्यातील सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला.