टिटवाळ्यात कापडी पिशवी व्हेंडिग मशीन उदघाटन सोहळा
एक पाऊल पर्यावरणाच्या रक्षणासाठी या जाणीवेतून सामाजिक दायित्व जपत रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संकल्पनेतून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर,टिटवाळा यांना मे.घरडा केमिकल्स लिमिटेड यांनी कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत कापडी पिशवी व्हेंडिग मशीन दिलेली आहे.
हि कापडी व्हेंडिंग मशीन मंदिराच्या शेजारील कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शॉपिग कॉम्प्लेक्सच्या गाळा क्रमांक 1 मध्ये बसविण्यात आली आहे .
या मशीनचा लोकार्पण सोहळा प्रमुख अतिथी ,मान्यवर व टिटवाळा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 18/11/2025 रोजी सकाळी 11 वाजता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शॉपिग कॉम्प्लेक्सच्या गाळा क्रमांक 1,गणपती मंदिर,टिटवाळा येथे होणार आहे
तरी कापडी पिशवी व्हेंडिग मशीन उदघाटन सोहळ्यास सामाजिक बांधिलकी जपत सर्वानी आवर्जून उपस्थित रहावे
हि नम्र विनंती
आपले,
श्री सिद्धिविनायक मंदिर ट्र्स्ट
मे. घरडा केमिकल्स लिमिटेड
रेड स्वस्तिक सोसायटी