कॉ.कारभारी उगले यांना रोटरी जीवन गौरव पुरस्कार जाहीर प्रांतपाल डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या हस्ते मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल च्या वतीने देण्यात येणारा रोटरी जीवन गौरव पुरस्कार अकोले तालुक्यातील सामाजिक,राजकीय चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. कारभारी उगले यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा
अकोले महाविद्यालयाच्या कै. के.बी.दादा देशमुख सभागृहात
मंगळवार ,दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता रोटरी 3132 चे प्रांतपाल रो.डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे यांच्या शुभहस्ते व रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष रो सचिन आवारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लबचे सचिव रो.प्रा.डॉ.सुरींदर वावळे यांनी दिली.
यावेळी रोटरीचे उपप्रांतपाल रो.दिलीप मालपाणी, पब्लिक इमेजचे डिस्ट्रिक्ट सल्लागार रो.अमोल वैद्य, सचिव रो.प्रा.डॉ.सुरींदर वावळे, उपाध्यक्ष रो.संदीप दातखिळे, खजिनदार रो.गंगाराम करवर हे उपस्थित राहणार आहेत.
कॉ. उगले अर्ध शतकापेक्षा जास्त काळ राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत .विविध चळवळी च्या माध्यमातून त्यांनी मुख्यतः विडी कामगार,शेतकरी ,शेत मजूर यांना न्याय मिळवून दिला आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तालुका पातळी पासून जिल्हा, राज्य व देश पातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लबचे संचालक मंडळ,व सर्व सदस्य यांनी केले आहे.