बल्याणी प्रभाग क्रमांक 11 परिसरात विकास कामांचा शुभारंभ
माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या पाठपुरावा
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग क्रमांक 11 बल्याणी येथील स्थानिक नगरसेविका व माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील यांनी पाठपुरावा करून रस्ते गटारे कामांसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत सदरील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, माजी नगरसेविका नमिता पाटील,पंडीत कुलकर्णी,अमोल कुलकर्णी,विजय भोईर, शाखा प्रमुख महेश पाटील,शिवाजी गोंधळे,अरफाज गुजर,जककी पाकुर्डे, राजु पाटील,संदीप पाटील, पंकज सिंग,समीर गायकवाड, पंकज सिंग,समीर गायकवाड,प्रकाश पाटील,सिद्धार्थ जाधव,संदेश जाधव,दशरथ गायकर,महेश पाटील,भरत मढवी,सूरज पावशे,यांच्या सह आदि उपस्थित होते.
वैष्णवी माता मंदिर ते आय इ एस स्कुल पर्यंत रस्ता व गणेश नगर ते गल्ली नंबर सहा पर्यंत रस्ता, तसेच सिध्दार्थ जाधव ते असलम गुजर यांच्या घरा पर्यंत रस्ता हया तिन्ही कामांसाठी माजी नगरसेविका नमिता पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधी उपलब्ध करुन देणे बाबत सातत्याने पाठपुरावा केला तसेच महापालिका प्रशासनाकडे हि पाठपुरावा करून तिन्ही विकास कांमासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले.