रायते येथील अंखड हरिनाम सप्ताहाची सांगता
हभप विश्वनाथ महाराज वारिंगे यांचे काल्याचे किर्तन
रायते :- रायते येथे अंखड हरिनाम सप्ताहाची हमप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता मोहने (जैतू मुठोळकर) सालाबादप्रमाणे रायते ता,कल्याण येथे हनुमान जयंती निमित्त अर्थात रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचे सत्तावीसावे वर्षे असून या सतावीस वर्षात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तन कारानी हजेरी लावली होती या मध्ये किर्तन केसरी हभप पांडूरंग महाराज आव्हाड, हभप मठाधिपती माधव महाराज घुले थोर प्रबोधन कार हभप निवृत्ती महाराज इंदूरीकर, रामायणाचार्य हभप विश्वनाथ महाराज वारिंगे इ किर्तने गाजली म्हणून रायते गावचा सप्ताह नावारुपाला आला. शिवाय हनुमान जयंती दिवशी मोठी यात्रा भरते
या वर्षी देखील सात दिवस पारायण, प्रवचन, हरिपाठ, जागर भजन असे भरगच्च कार्यक्रम झाले. या वेळी भाविकानी श्रवणाचा लाभ घेतला आणि १३ एप्रिल रविवार रोजी सकाळी साडे नऊ ते साडेअकरा वाजता रामायणाचार्य हभप विश्वनाथ महाराज वारिंगे (पाले अंबरनाथ)
यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली, या वेळी आलेले मान्यवर तसेच सात दिवस अखंड सेवा करणाऱ्या सेवाधारी भाविकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व कडक उन्हाळा असून देखील मोठ्या संख्येने भाविक भक्तानी व परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा व महा प्रसादाचा लाभ घेतला आणि सप्ताहाची सांगता झाली परंतु श्रद्धेची सांगता संपत नाही गोवेली येथे मोठा सप्ताह घेण्याचे ठरविले आहे परंतु सर्वाची साथ हवी किमान पन्नास हजार भाविक हवेत दररोज पाच हजार पारायणासाठी, पाच हजार विणेकरी असे वांरिगे महाराज यांनी सांगितले, तारीख निश्चित नाही.