डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिन साजरा
आज २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक बल्याणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून व संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पेढे वाटून संविधान गौरव दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी हेमंत बबन गायकवाड अध्यक्ष भाजपा वार्ड क्र.११ बल्याणी,संदिप बबन गायकवाड अध्यक्ष आयुष्मान भारत योजना टिटवाळा मंडल,तेजेश्री हेमंत गायकवाड उपाध्याक्षा भाजपा महिला मोर्च्या टिटवाळा मंडल,भाग्यश्री नेताजी मोरे,उषा तिवारी,श्रावण पाटील,नेताजी कांबळे,कल्पेश गायकवाड,सहदेव गुजर इत्यादी कार्यकर्ते वा नागरिक उपस्थित होते.