उंभरणीत मोठ्या प्रमाणात चाळींचे बांधकामे सुरूच
सहाय्यक आयुक्तांचे दुर्लक्ष कि छुपा पाठिंबा
राजू टपाल.
टिटवाळा :- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात वेग आला असून अ प्रभागातील उंभरणी परिसरात मोठ्या प्रमाणात चाळींचे बांधकामे सुरु झालेली आहेत सदरील बांधकामांकडे अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे हे दुर्लक्ष करीत असून त्यांचाच तर छुपा पाठिंबा तर नाही ना असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
सदरील बांधकामे हे आदिवासी पाडा परिसरातील मोबाईल टॉवर जवळ बिनदिक्कतपणे सुरु असून विकासक बिनधास्त पणे बांधकामे करीत आहेत. मात्र याकडे अ प्रभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असून त्यामुळे अनधिकृत बांधकाम विकासकाचे चांगलेच फावले आहे. सदरील बांधकामावर कारवाईचा बडगा कधी उगारणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
-----------------------------