ऑल इंडिया सिख वेलफेयर असोसिएशन व जय हो सेवा चैरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनानक जयंती निमित्त शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळात
गुरद्वारा श्री गुरु नानक दरबार, शेरे पंजाब कॉलनी, अंधेरी(पूर्व ) मुंबई येथे पद्मश्री डॉ. जीतेन्द्र सिंह शन्टी साहेब,(शहीद भगत सिंह सेवा दल) व मुंबईचे महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर कोविड काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन, गरजवंतांना रक्त मिळण्यासाठी मदत, तृतीय पंथीयांसाठी तसेच गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप व शून्य कचरा मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा याचे वर्गिकरण करण्यासाठी प्रत्यक्षात १०० पेक्षा जास्त सोसायटी व चाळीमध्ये जाऊन समाजप्रबोधन केल्याबद्दल श्री प्रमोद नांदगावकर यांना *कोरोना योद्धा* म्हणून पद्मश्री डॉ. जीतेन्द्र सिंह शन्टी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर राघबीर सिंह गिल ( चेयरमैन गुरु नानक हॉस्पिटल व अध्यक्ष - श्री गुरु सिंह सभा दादर मुंबई),
डॉ. अनिल शर्मा( प्रोफेसर आणि हेड कार्डिलॉजी बॉम्बे हॉस्पिटल),
डॉ. नरेंद्र शर्मा (सी ई ओ, गुरु नानक हॉस्पिटल),
धीरज कुमार वर्मा (खली ),
चरण सिंह सपरा,( काँग्रेस कार्याध्यक्ष मुंबई),
मोहन राठोड (IPS) सेवा निवृत,
संदीप राजू नाईक (नगरसेवक), डॉ सईदा खान (नगरसेविका) व इतर मान्यवर उपस्थित होते .
तसेच ज्या लोकांनी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचाही सत्कार करण्यात आला.