टोकावडे येथे कोविड लसीकरण सत्राचे मोरोशी आरोग्य केंद्रा तर्फे आयोजन !
कोरोना महामारी रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही नागरिकांना लस मिळत नसल्याने चार चार तास लाईन लावून लस मिळत नव्हती आता जास्त प्रमाणात लस शिल्लक रहात असून नागरिक दवाखान्यात जात नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी यांनी टोकावडे बाजारात लस देण्याचे उपक्रम राबविले.
टोकावडे येथे शुक्रवारी आठवडी बाजार असतो,या दिवशी परिसरातील बहुतांश नागरिक येथे येत असतात.याच मुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी तर्फे कोविड लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते.नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असुन या मध्ये ३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथील वैद्यकीय अधिकारी तेजश्री घोटकर, आरोग्य सेविका माधुरी सनाप,मानसी कांबळे,हरेश सापळे, राजेश देशमुख,व ग्रामस्थ उपस्थित होते.