बजरंगवाडी येथे नगर - पुणे महामार्गाच्या कडेला धोकादायक खड्डा
शिक्रापूर :- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी पासून थोड्याच अंतरावर नगर -पुणे महामार्गाच्या कडेला धोकादायक खड्डा असून या धोकादायक खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव घारे यांनी या धोकादायक खड्ड्याबाबत टिटवाळा न्यूज ला सांगितले,शिक्रापूरवरून पुण्याकडे जाताना बजरंगवाडीच्या पुढे साधारण ५० ते ६० मीटर अंतरावर नगर -पुणे महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूला अंदाजे ५ ते ६ फूट लांब,५ फूट खोल,४ फूट रूंदीचा भला मोठा खड्डा दि.१२ डिसेंबरपूर्वी खोदून ठेवलेला आहे. हा धोकादायक खड्डा डांबरी महामार्गाच्या कडेला साईड पट्टीवर खोदून ठेवला असल्यामुळे पुण्याच्या दिशेने प्रवास करणा-या वाहनांना तसेच प्रवाशांना धोकादायक ठरत आहे.या धोकादायक खड्ड्यामुळे दुचाकी,चारचाकी वाहने खड्ड्यात जावून अपघाताची दाट शक्यता आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील राहूल कदम साहेब यांना मी व्हाॅटस् अॅपवर दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी सदर खड्ड्याबाबत कळविले आहे.दोन तीन वेळा फोनवर संपर्कही केलेला आहे .फोनवर संपर्क केल्यानंतर चौकशी करतो,माणूस पाठवतो असे सांगितले.परंतू सदर खोदलेल्या धोकादायक खड्ड्याबाबत कोणतीही कार्यवाही २४ डिसेंबर २०२५ पर्यंत झालेली नाही असे शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अंकूशराव घारे यांनी सांगितले