दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू ; करंजी ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथील घटना
दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून १ किलोमीटर अंतरावर भावले वस्तीवर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
गोपीनाथ लक्ष्मण भावले वय ८० वर्षे असे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले वय - ७६ या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या आहेत.
भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ भावले व शांताबाई भावले हे पती पत्नी दोघेच होते.
घरामधील मोठा ऐवज चोरीस गेल्याचे समजते.
घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक मनोज पाटील उप अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी भेट दिली.