दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला लासलगाव पोलीसांनी अटक केली.
साबीर शब्बीर कुरेशी वय -२८, सर्फराज बाबा शेख वय -१९, कुर्बान ईस्माईल शेख वय -२३, सनिराज विलास ढोकणे वय -१९, सागर उर्फ संदीप सुरेश कांबळे वय -२६, योगराज मोहन सोनवणे वय -२४ सर्वजण रा.श्रीरामपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून इंडिका कारसह १ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवारी दि.१९ ऑक्टोबरला पेट्रोलिंग सुरू असताना टाकळी विंचूर परिसरात नाकाबंदी केलेली होती. त्यावेळी चांदवडहून लासलगावला येणारी एम एच १२ एम बी ४०७१ या क्रमांकाची कार पोलीसांची नाकाबंदी पाहून थांबली. नाकाबंदीपासून काही अंतरावर पोलीसांना पाहून वाहन वळवत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस अधिकारी व अंमलदारांनी धाव घेत वाहन थांबविले.
कारमध्ये असलेले सहा जण दरवाजे उघडून पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ,पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे सहाय्यक उपनिरीक्षक शिवाजी घोडे पुढील तपास करीत आहेत.