दौंडमधील व्यापा-याला हातचलाखीने सव्वा लाखाला लुटले
दौंडमधील कापड व्यापा-याला दोन अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रूपयांना गंडा घातल्याची घटना घडली.
याप्रकरणी कापड दुकानाचे मॅनेजर पांडुरंग गुंड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन अज्ञात व्यक्तींविरोधात दौंड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दौंड येथील शिवाजी चौकात भर रस्त्यावर असलेल्या कापड स्टोअर्स मध्ये दोन व्यक्ती आल्या. त्यांनी कापड दुकनदाराकडे मोजे मागितले. दौन्ही व्यक्ती इंग्रजीतून बोलत होत्या. कापड दुकानात आलेल्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती अंडरवेअर घेण्यासाठी दुसरीकडे गेला. मोजे घेतलेल्या व्यक्तीला पैसे परत देत असताना या माणसाने खिशातील पाकीट दोन वेळा गल्ल्यावर असलेल्या दुकानातील कामगाराच्या तोंडासमोर खालीवर केले. त्यानंतर या व्यक्तीने दुकानाच्या गल्ल्यातील २ हजार आणि ५०० रूपयांच्या नोटा पाहाण्याच्या बहाण्याने गल्ल्यातील नोटा हातचलाखीने लंपास केल्या. असे फिर्यादीत म्हटले आहे.
दोन्ही चोरटे सी सी टी व्ही फुटेजमध्ये जेरबंद झाले असून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत.