• Total Visitor ( 133931 )

माघ पौर्णिमेचे औचित्य साधून कोंढापुरीतील खंडोबा देवाचे भाविकांकडून दर्शन 

Raju tapal February 13, 2025 31

माघ पौर्णिमेचे औचित्य साधून कोंढापुरीतील खंडोबा देवाचे भाविकांकडून दर्शन 
          
शिरूर :- माघ पौर्णिमेचे औचित्य साधून आज बुधवार दि.१२ फेब्रुवारीला शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला.
माघ पौर्णिमा निमित्ताने कुलदैवत खंडोबा मुर्तीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.मल्हार गडावरील खंडोबा मंदीर सभामंडपात जागरण गोंधळाचेही आयोजन करण्यात आले होते.
माघ पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते , कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या रंजनाबाई विलासराव गायकवाड, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शामराव विष्णूजी गायकवाड, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक, "टिटवाळा न्यूज" चे शिरूर तालुका प्रतिनिधी, पत्रकार विजयराव ढमढेरे,ग्रामस्थ शामराव नामदेव गायकवाड,विठ्ठल रामराव गायकवाड यांनी सकाळी ११ वाजता माघ पौर्णिमेचे औचित्य साधून  खंडोबा देवाच्या दर्शनाचा लाभ घेतला. दर्शन घेणा-यांमध्ये महिलांचाही समावेश होता.
ग्रामस्थ भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत ,भंडार खोब-याची उधळण करत, देवाची तळी भरणे, नैवेद्य ठेवणे आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पाडले.
कोंढापुरी येथील मल्हारगडावरील कुलदैवत खंडोबा अतिशय जागृत देवस्थान समजले जात असून शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात हे देवस्थान प्रसिद्ध आहे. 
स्कंद पुराणात अशी कथा सांगितली जाते, शुभव्रत नावाचा एक ब्राह्मण नर्मदा नदीकिनारी वसलेल्या गावात राहात होता.त्यांना वेद विद्येचे उत्तम ज्ञान होते.पैसा कमविण्यात ते नेहमी व्यस्त असत.त्यामुळे पुजा विधीमध्ये त्यांचे मन रमत नव्हते.परंतू त्यांचे वय जसजसे वाढू लागले व ते वृद्धावस्थेत जावू लागले तसतसे त्यांना आपण पुजा विधी करावी ,देवाचे नाव घ्यावे असे वाटू लागले.श्लोकाचा त्यांनी जप करणे सुरू केले.यानंतर १० व्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला.पैसे कमावण्याच्या नादात त्यांनी अनेकांना दुखावले होते.त्यांच्या अशा वागणुकीचा अनेकांना त्रास झाला होता.यामुळे त्या ब्राह्मणाला पाप लागले.या पापातून त्यांना मुक्ती मिळाली.ती केवळ माघ महिन्यातील ९ दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे.त्यामुळे माघ पौर्णिमेला नदी स्नानाचे अधिक महत्व सांगितले जाते.
रामायणातही अशी कथा सांगितली जाते, राणी कैकयी यांनी श्रीरामाला वनवासात पाठविले.हे कळताच क्रोधीत झालेल्या भरताने आपल्या मातेला कैकयीला रागाच्या भरात शाप दिला तो असा, तुझी सर्व पुण्यकर्मे नष्ट होतील.तुला माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही.
माघ पौर्णिमेला नव्याची पुनव असेही म्हणतात.या महिन्यात घरामध्ये नवीन धान्य आलेले असते.त्या धान्याचे पुजन करण्याचा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा. भूमी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा व शेतीशी संबंधित असणारा हा माघ पौर्णिमा सण असेही सांगितले जाते.
            

Share This

titwala-news

Advertisement