• Total Visitor ( 133114 )

धुक्यामुळे 88 रेल्वे गाड्या रद्द तर 335 गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Raju Tapal January 08, 2023 37

धुक्यामुळे ८८ रेल्वेगाड्या रद्द तर ३३५ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

नवी दिल्ली - कडाक्याची थंडी आणि धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून रविवारी त्यामुळे ८८ गाड्या पूर्णपणे रद्द कराव्या लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. धुक्यामुळे ३१ गाड्या इतर मार्गाने वळवाव्या लागल्या तर ३३ गाड्या निर्धारित स्थानकाआधी थांबवाव्या लागल्या. याशिवाय ३३५ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून या गाड्या उशिराने धावल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.

उत्तर आणि पूर्व भारतात दाट धुक्यामुळे जनजीवन अस्त-व्यस्त झाले आहे. केवळ रेल्वेच नव्हे तर रस्ते आणि हवाई वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. दिल्लीच्या पालम विमानतळावर रविवारी सकाळी दृष्यता ५० मीटरपर्यंत कमी झाली होती. धुक्यामुळे अनेक विमानांचे आगमन आणि प्रस्थान लांबल्याची माहिती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून देण्यात आली. दरम्यान दिल्लीत रविवारी किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविले गेल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

Share This

titwala-news

Advertisement