डिझेल आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या तरूणावर बिबट्याचा हल्ला
Raju Tapal
December 29, 2021
48
डिझेल आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या तरूणावर बिबट्याचा हल्ला ; आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील कासारमळ्यातील घटना
डिझेल आणण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या तरूणावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील कासारमळ्यात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.
तानाजी प्रभाकर झांबरे रा.वळती ता.आंबेगाव असे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे.
शिंगवे येथे भागडी रस्त्यावर कासारमळा असून तेथे वळती येथील तानाजी प्रभाकर झांबरे हे डिझेल आणण्यासाठी भीमाशंकर कारखान्यावर दुचाकीवरून चालले होते.त्यावेळी ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी झांबरे यांचा डावा पाय बिबट्याने तोंडात पकडला. तानाजी झांबरे यांनी प्रसंगावधान राखून दुचाकी तशीच पुढे जलद गतीने नेल्यामुळे बिबट्याने त्यांचा पाय सोडून दिला.
त्यांच्या पायाला बिबट्याचे दात व नखे लागली. स्थानिक तरूणांनी तानाजी झांबरे यांना मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Share This