श्री क्षेत्र टिटवाळा ते गोवेली पायी दिंडी सोहळा संपन्न
अखंड हरिनाम सप्ताह धर्म जागरण महोत्सव 16 डिंसेबर ते 23 डिसेंबर रोजी गोवेली येथे सुरू झाले असून तत्पूर्वी 16 डिंसेबर रोजी सकाळी श्री क्षेत्र टिटवाळा ते गोवेली येथे पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या हस्ते व संत स्वामी शिवरूपानजी महाराज,हभप विश्वनाथ महाराज वारिंगे,मंडळ अध्यक्ष हभप माधव महाराज केशव यांच्या उपस्थितीत सकाळी टिटवाळा मंदिर येथे गणेश पुजन, विठ्ठल रखूमाई पुजन व माऊलीचे पुजन करून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. दिंडी मध्ये विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच विविध संघटनेचे प्रतिनिधी,वारकरी संप्रदाय मंडळ,महिला मंडळ सह कल्याण,मुरबाड,शहापूर,अंबरनाथ,बदलापूर,उल्हासनगर,भिवंडी परिसरातील असंख्य वारकरी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वारकरी पायी दिंडीत भजनात दंग झाले होते,तसेच महिलांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन भजन करीत होते. पाळखी सोहळा गोवेली येथे संपन्न झाला. तसेच खास करून अश्वांचे रिंगण हा महत्त्वाचा सोहळा असंख्य वारकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. आजपासून आठ दिवस ठाणे जिल्ह्यातील वारकरी यांना किर्तनाची मेजवानी मिळणार आहे.