महाशिवरात्री निमित्ताने शिवभक्तांना कलिंगड वाटप
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वॉर्ड क्रमांक आठ मांडा पश्चिम शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही मांडा पश्चिम शिवमंदिर जवळ येणाऱ्या शिवभक्तांसाठी मोफत कलिंगड प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी उपशहर अध्यक्ष दिनेश भोय,विभाग अध्यक्ष मधुकर भोईर, माजी नगरसेविका अपेक्षा जाधव, बंदेश जाधव, सदगुरु मढवी, चंद्रकांत भोय,राजु भोईर,दशरथ भोईर उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर भोईर यांनी महाशिवरात्री निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या.