डोंबिवली मध्ये फोर्टी - फिफ्टी प्लस गायन संधी संपन्न..
डोंबिवली :- केवळ किचन बाथरूम मधे आणि मनातल्या मनात गाणा-यांना स्टेजवर गाण्याची संधी उपलब्ध व्हावी या इराद्याने रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी प्रा. दिपक जाधव आणि रेखा निकुंभ यांच्या तर्फे डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यालयात फोर्टी - फिफ्टी प्लस हौशी गायकांना गाण्याची संधी उपलब्ध करून दिली.. या संधीचा नवोदितांनी जोरदार लाभ घेतला.. डोंबिवली.. नाशिक आणि मुंबईतील अनेक 40 + पासून अगदी 75 + गायक गायिकांनी आपल्या गाण्यांनी वातावरण प्रसन्न केले..
कार्यक्रमाला परीक्षक म्हणून संजय खडपे यांनी मोलाचे योगदान दिले. संजय खडपे यांनी गाणं कसं गायला हवं या बद्दल नवोदित गायकांना स्वतः गाणे गाऊन मार्गदर्शन केले तर दुसऱ्या परीक्षक तथा आयोजक असलेल्या रेखा निकुंभ यांनी त्यांच्या गोड आवाजात अंबेमातेची आरती गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले. प्रा.दिपक जाधव यांनी गाणे कसे निवडायचे आणि तिथे गायल्या गेलेल्या प्रत्येक गाण्याचा किस्सा सांगत खुमासदास सुत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील बनसोडे, साईली बनसोडे, सर्वोदय प्रसाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शाम चौगले, शिवाजी जाधव, समाधान बाविस्कर,जय डगळे, हर्ष डगळे, रोहित मुळे, नरेंद्र वैराळ, दिलीप मिश्रा, रवी लोहार, प्रिया पाटील, मनिष दुबे, महेंद्र धुरळ, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे सर,रमेश शिंदे, बाबुराव जाधव. रणधीर कणोजिया. लता जाधव आदी अनेकांनी सहकार्य केले. तर गायक म्हणून दिपा देहेरकर. गुरूनाथ आरावकर. लतिका जोगळेकर. विद्या कुलकर्णी. पुंडलिक गोडे. रविकांत जाधव. योगेश बोरसे. महेश भागवत. नरेंद्र वैराळ. वैशाली टण्णू. आशा चौधरी. सुनंदा शेलार. मनिषा कोदे. डाॕ. नेहा निकुंभ. मंगल पवार. मीना पाटील. मनीषा पवार. उषा वाघुळदे. उषा घोरपडे. सुवर्णा क्षीरसागर अशा अनेक गायक गायिकांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित गायक गायिकांना प्रशस्तीपत्र आणि मंगल पवार, आशा चौधरी,योगेश बोरसे,महेश भागवत, गुरूनाथ आरावकर आणि रविकांत जाधव या सहा जणांना विशेष प्राविण्य सन्मानचिन्हं देण्यात आली. रेखा निकुंभ यांच्या आजवरच्या गायन प्रवासाचा सन्मान करीत प्रा. दिपक जाधव यांनी रेखा निकुंभ यांना मानाचा गझल पुरस्कार प्रदान केला.
अशा प्रकारचे कार्यक्रम जगण्याला बळ देतात आणि पुन्हा तारूण्यात घेऊन येतात म्हणून प्रा. दिपक जाधव आणि रेखा निकुंभ यांनी डोंबिवलीच्या ७५ वय पार केलेल्या आणि या कार्यक्रमात दोन गाणी गायलेल्या विद्या कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया नोंदवली.