दिवाळी पहाटेला फडके रोडवरील कार्यक्रम आणि तरुणाईचा सळसळता उत्साह ही डोंबिवली शहराची वेगळी ओळखच ठरली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे हा उत्सव साजरा करता आला नसला तरी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मनसेच्या वतीने हिंदूंचा सण दिवाळी हा उत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. दिवाळी निमित्ताने मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी योग्य त्या परवानग्या घेऊन कार्यक्रम करणार असल्याचे पक्षाकडून कळविण्यात आले आहे.