• Total Visitor ( 84533 )

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार ,एक गंभीर जखमी

Raju tapal October 15, 2021 35

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार ,एक गंभीर जखमी

           ------------------

दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर एकजण गंभीर झाल्याची घटना पुणे परिसरात घडली.

कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार आय टी अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना थेरगाव  येथे  चिंचवडकडून डांगे चौकाकडे येणा-या रस्त्यावर घडली.

शैलेंद्रसिंग गणसिंग राजपूत वय ४३ सध्या रा.मारूंजी ता.मुळशी जि.पुणे मुळ रा.एरंडोल जि.जळगाव असे मृत्यू झालेल्या आय टी अभियंत्याचे नाव आहे.

गणसिंग रामसिंग पाटील वय -७२ रा.एरंडोल जि.जळगाव यांनी अपघाताची फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दिली.

शैलेंद्रसिंग राजपूत नुकतेच तीन दिवसांपूर्वी एरंडोल येथे आईवडील, मित्रपरिवारास भेटून पुण्यात परतले होते. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून चिंचवडकडून डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी थेरगाव येथे त्यांच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागला. डंपरच्या धक्क्याने राजपूत रस्त्यावर पडले. राजपूत यांना सांगवी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

दुस-या घटनेत जांभूळवाडी दरी पुलावर मुंबईकडे जाणा-या रस्त्यावर दोन दिवसांपासून रेती वाहतूक करणारा एम एच १७ बी डी ७७६७ क्रमांकाचा ट्रक बंद अवस्थेत उभा होता. त्याला पाठीमागून गॅस वेल्डिंगच्या टाक्या वाहतूक करणा-या एम एच १४ ई एम ३६९६ या क्रमांकाच्या पिकअपने जोराची धडक दिली. धडकेत एकाचा जागीच मृत्यू  झाला. एक जण गंभीर जखमी झाला.

प्रवीण देवडकर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून अपघातातील मृताचे नाव समजू शकले नाही.

भारती विद्यापीठ पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

Share This

titwala-news

Advertisement