डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 6 फूट सोन्याची प्रतिमा भेट देणार
उल्हासनगरातील तक्षशिला महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 6 फूट सोन्याची प्रतिमा गिफ्ट करणार असल्याची घोषणा जगविख्यात गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी केली आहे. रोहित पिसाळ हे "सुशा अंडरवॉटर गोल्ड मायनिंग" कंपनीचे मालक आहेत. वास्तविकता सोने हे बुद्ध धातु म्हणूनच ओळखले जाते आणि त्याची धरोहर ही बुद्धांचीच देन आहे असे जगातील पाण्याखालील सोन्याचे उत्खनन करणाऱ्या तिसऱ्या क्रमांकावरील कंपनीचे मालक, गोल्डमॅन व कट्टर आंबेडकराईट रोहित पिसाळ यांनी प्रतिपादन केले. आंबेडकरी जनतेने आर्थिक संपन्नतेकडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.