डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी
महापालिकेतर्फे अभिवादन !
भारताचे माजी राष्ट्रपती , महान वैज्ञानिक, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन आज महापालिकेत उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्य उद्यान अधीक्षक तथा विभागप्रमुख,(माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी स्व.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी उपस्थित शिक्षणाधिकारी विजय सरकटे, उपमुख्य सुरक्षा अधिकारी सुरेश पवार,सामाजिक कार्यकर्ते पंकज सिंग यांनी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्व.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प सुमने अर्पण करून अभिवादन केले.