आमदाबाद फाटा चौकातील खड्ड्यामुळे वाहनचालक,प्रवासी त्रस्त
शिरूर :- शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा चौकातील खड्ड्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक,प्रवासी त्रस्त झाले आहेत.
आमदाबाद फाटा चौकातील रस्ता शिरूर - पाबळ तसेच टाकळी हाजी - श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती रस्त्याला जोडलेला असून आमदाबाद फाटा चौक नेहमीच गजबजलेला असतो.
आमदाबाद फाटा चौकातून सोनेसांगवी, ढोकसांगवी, रांजणगाव एम आय डी सी, कारेगाव श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती, अण्णापूर, येवलेवस्ती श्री.क्षेत्र रामलिंग, शिरूर तसेच मलठण, कान्हूरमेसाई, पाबळ,रेटवडी, राजगुरूनगर ,मंचर घोडेगाव, जुन्नर, शिवनेरी,पेठ, आळेफाटा, नाशिक या गाव शहरांकडे प्रवास करणारे प्रवासी, वाहनचालक, दुचाकीस्वार प्रवास करत असतात.
आमदाबाद फाटा चौकातील खड्ड्यामुळे दुचाकी ,चारचाकी वाहने आदळत प्रवास करत असतात.
शिरूर येथील श्री.क्षेत्र रामलिंग देवस्थानची यात्रा महाशिवरात्रीला साजरी होत असून महाशिवरात्र यात्रा बुधवार दि.२६ फेब्रुवारीला आहे. श्री.क्षेत्र रामलिंग येथील रामलिंग महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांची ,प्रवाशांची ,वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून महाशिवरात्रीला वाढते. आमदाबाद फाटा - सोनेसांगवी रस्ता अतिशय अरूंद असून रस्त्याच्या साईडपट्टीवरील मुरूम वाहून गेल्यामुळे डांबरी रस्ता उंच ,साईडपट्टी खोलवर गेली आहे. समोरून येणा-या वाहनांना रस्ता देताना वाहने साईड पट्टीवर घेवून चालवावी लागत असल्याने वाहने हेलकावत चालकांना चालवावी लागत आहेत. रस्ता अरुंद,साईडपट्टी खोलवर गेलेली असल्याने वाहने हेलकावत असल्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
सोनेसांगवी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील रस्ताही खड्डे पडून अतिशय खराब झालेला आहे. चौकातील खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी,वाहनचालक, दुचाकीस्वार त्रस्त झालेले असल्याने या रस्त्यावरील साईडपट्टीची दुरूस्ती करून आमदाबाद फाटा चौकातील तसेच सोनेसांगवी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील खड्ड्यांची डांबर मिश्रित खडीने दुरूस्ती करण्यात यावी या प्रतिक्षेत तेथील ग्रामस्थ ,प्रवासी, वाहनचालक,दुचाकीस्वार आहेत.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर