दुचाकी चोरणा-या आरोपीस लोणीकंद पोलीसांकडून अटक
Raju Tapal
November 17, 2021
45
लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एम आय डी सी भागातील दुचाकी वाहनांची चोरी करणा-या आरोपीस लोणीकंद पोलीसांनी अटक केली.
देविदास सुभाष दहिफळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दि.१२ नोव्हेबरला सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार कर्मचा-यांसह लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक विनायक साळवे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानूसार भावडी रोड वाघोली येथे एकाजवळ एम एच १२ क्यू के ३६९५ या क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर तो ही मोटरसायकल लोकांना विकत घेता का ? असे विचारत आहे.
सदर ठिकाणी जावून शोध घेतला असता मोटरसायकलवर बसून एक जण काव-या बाव-या नजरेने पाहात असताना दिसला.
देविदास सुभाष दहिफळे वय -३० रा.बकोरी फाटा वाघोली फाटा ता.हवेली जि.पुणे मूळगाव चिंचपूर इजदे ता.पाथर्डी जि.अहमदनगर असे नाव त्याने सांगितले.विश्वासात घेवून त्याला विचारले असता सदर मोटरसायकल आपले घर सोसायटीजवळून चोरी केल्याचे त्याने सांगितले.
Share This