दुचाकीवरील तरूणाला रिक्षाने धडक दिल्याने अल्पवयीन तरूणाचा मृत्यू
Raju Tapal
December 10, 2021
44
दुचाकीवरील तरूणाला रिक्षाने धडक दिल्याने अल्पवयीन तरूणाचा मृत्यू ; कदमवाकवस्ती येथील घटना
दुध डेअरीत बिल देण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या अल्पवयीन तरूणाला रिक्षाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे घडली.
यश जितेंद्र पवार वय -१७ रा.पाषाणकर बाग लोणीकाळभोर असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अल्पवयीन तरूणाचे नाव आहे.
यश पवार दुपारी दुचाकी घेवून घरातून हिसार दुध डेअरी लोणी स्टेशन येथे बिल देण्यासाठी निघाला होता. पालखीस्थळ येथे पोहोचल्यानंतर लोणी स्टेशनकडून लोणीकाळभोर गावाकडे भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाचालकाने दुचाकीस धडक दिली यश याच्या डोक्याला . मार लागून गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचे वडील जितेंद्र छगन पवार यांनी विश्वराज रूग्णालयात दाखल कैले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
विशाल प्रकाश पवार वय ३५ रा..विठ्ठल मंदिरासमोर लोणीकाळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक भागवत शेडगे पुढील तपास करत आहेत.
अपघातातील दुस-या घटनेत समोरून येणा-या वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील गेवराई तालुक्यातील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला.
जीवन सुरेश नाडे रा.ढालेगाव , संतोष रामभाऊ वाघमोडे रा.तपेनिमगाव ता.गेवराई अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
अपघाताची ही घटना बुधवारी दि.८/१२/२०२१ रोजी पाथरी - परभणी रस्त्यावरील वडगाव फाटा येथे घडली.
अपघातातील मयत संतोष वाघमोडे हा युवक विवाहीत असून जीवन नाडे हा अविवाहित होता.
हे युवक गेल्या १ महिन्यापासून परभणी येथे कंत्राटदाराकडे रोजंदारीवर काम करत होते.
Share This