दुचाक्या चोरणा-या चौघांना कोतवाली पोलीसांकडून अटक
दुचाक्य चोरणा-या चौघांना अहमदनगर कोतवाली पोलीसांनी अटक केली.
शुभम बबन भापकर वय - २१ रा.गुंडेगाव ,नगर, कृष्णा बाबासाहेब गुंड वय - २५ रा.मेहेरबाबा वेशीजवळ अरणगाव ता.नगर , अभिषेक संतोष खाकाळ वय - २० रा.संभाजीनगर व्ही आर डी ई गेट अरणगाव ,जालिंदर अर्जून आमले वय - २१ रा.आमलेमळा आरणगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आरोपींनी चार दुचाकींसह दाळमंडई येथील दुर्गादेवी मंदीरात चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आरोपींकडून पोलीसांनी चार दुचाक्या हस्तगत केल्या.
पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डि बी पथकाने कायनेटिक चौकात सापळा लावून चौघा आरोपींना अटक केली.