ड्यूटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टी.सी.चा सोलापूर रेल्वे स्थानकावर दुर्दैवी मृत्यू
मस्टरवर सही करून ड्यूटी जॉईन करण्यासाठी निघालेल्या टी.सी.चा रेल्वेत चढण्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर घडली.
एजाज अ लतीफ सय्यद असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तिकीट निरीक्षकाचे नाव आहे.
एजाज सय्यद हे सोमवारी नेहमीप्रमाणे सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले.ड्यूटी जॉईन करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहका-यांशी संवाद साधला.
बोलता बोलता मस्टरवर सही करून ड्यूटी जॉईन करण्यासाठी रेल्वेत चढण्यापूर्वी अचानक त्यांना त्रास जाणवू लागला.
त्रास जाणवू लागताच रेल्वे कर्मचा-यांनी तात्काळ त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.त्यांच्यावर चिराग अली कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.