• Total Visitor ( 133402 )

नाशिकमध्ये आयशर-पिकअपचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू 

Raju tapal January 13, 2025 53

नाशिकमध्ये आयशर-पिकअपचा भीषण अपघात;
 ८ जणांचा मृत्यू 

नाशिक:-नाशिकमध्ये आयशर आणि पिकअप गाडीचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पिकअप गाडीने मागून धडक दिली. पिकअप गाडी ही भरधाव वेगात होती. चालकाला वेळीच गाडीवर नियंत्रण मिळवता आले नसल्याने हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरील द्वारका चौक परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

जखमींना स्थानिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेतील मृत आणि जखमी व्यक्ती हे सर्वजण कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कामगार निफाड येथील एका देवदर्शनाच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिस अपघाताची चौकशी करत आहेत. या अपघातामध्ये एका पिकअप टेम्पो (छोटा हत्ती) लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला धडकला. या ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगातून आरपार गेल्याने ८ जणांचा मृत्यू झाला.

या अपघातामुळे द्वारका उड्डाणपुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंगात सळया शिरल्यानंतर मुलांच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव झाला. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील आणखी चार जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांकडून बराचवेळ वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु होते. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, भद्रकाली पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु करुन जखमींना रुग्णालयात पाठवले.

 

Share This

titwala-news

Advertisement