एकादशीनिमित्त श्री.क्षेत्र आळंदीकडे पायी चाललेल्या दिंड्यांचे ठिकठिकाणी स्वागत.
-----------------
रामकृष्ण हरी ,जय जय राम कृष्ण हरी ...., ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत टाळ मृदंगाच्या साथीत एकादशीनिमित्त श्री.क्षेत्र आळंदीकडे पायी चाललेल्या दिंड्याचे ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी स्वागत केले.
मंगळवार दि. २३ /११/२०२१ रोजी नागेश्वर मंदीर भाळवणी या ठिकाणाहून सायंकाळी ७ वाजता प्रस्थान केलेल्या श्री. नागेश्वर पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत करून जामगाव येथील अक्षय जालिंदर काळे, तराळवाडीफाटा येथील सहदेव तराळ , सखाराम औटी पारनेर, भरत गायकवाड, बबनराव वाखारे पानोली, भाऊसाहेब रोहोकले पिंपळनेर, बाळासाहेब गुगळे, बी डी शेळके, रजपूतसाहेब, अविनाश खंदारे वाडेगव्हाण, मनसुखशेठ राक्षे गव्हाणवाडी, सुरेश पाचारणे शिरूर, नामदेव रोहोकले त्रिंबक आप्पा रोहोकले न्हावरा फाटा ,शरद पवार जामगाव, लक्ष्मण देशमुख कारेगाव, सुभाष लांडे रांजणगाव गणपती, निवृत्ती लांडे कोंढापुरी यांनी पायी दिंडीतील वारक-यांची सकाळचा चहा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण मुक्कामाची व्यवस्था केली.
गोरक्षशेठ रोहोकले यांनी दिंडीकाळातील संपुर्ण नाष्ट्याची सोय केली.
घोटवी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर येथील भैरवनाथ भजनी मंडळ पायी दिंडीचे शिरूर, सरदवाडी, फलकेमळा,कारेगाव, कावळेविहीर, रांजणगाव गणपती, खंडाळे, कोंढापुरी, शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी स्वागत करून पायी दिंडीतील वारक-यांना शुभेच्छा दिल्या.
२४/११/२०२१ रोजी कोळगाव आठखांब गणपती मंदीर या ठिकाणाहून प्रस्थान केलेल्या रामकृष्ण हरी पायी दिंडी सोहळ्याचेही ठिकठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत केले.
किसन गुलाब जगताप, अशोक जगताप, गंगाधर जगताप ,सौ.किसाबाई गावडे, कांतीलाल मोहारे मोहारवाडी, रामदास सरोदे सरोदेमळा, विठ्ठलराव कवडे, शिवाजीराव जाधव कोंडेगव्हाण, वनपुरे निंबवी, आप्पा ढवळे ढवळगाव, सरपंच विश्वास गुंजाळ देवदैठण भाऊसाहेब पोपट नरवडे खंडाळे, जिजाबापू तोंडे, अंजना देविदास काकडे कासारी फाटा,भाऊसाहेब लगड, बी.के.लगड, गोरक्षनाथ निगडे, विनायक दादाभाऊ हरगुडे सराटेवस्ती या भाविक ग्रामस्थांनी रामकृष्ण हरी पायी दिंडी सोहळ्यातील वारक-यांची सकाळचा नाष्टा, चहापाणी, दुपारचे जेवण, नाष्टा, संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली.
भाळवणी येथील ह.भ.प.श्री.भानुदास माधव तरटे यांनी श्री. नागेश्वर पालखी सोहळ्याची , दिंडीचालक ह.भ.प. एकनाथ महाराज निंभोरे यांनी भैरवनाथ भजनी मंडळ पायी दिंडी सोहळ्याची, कोळगाव जगताप मळा येथील ह.भ.प. श्री.सुदाम रघुनाथ जगताप यांनी रामकृष्ण हरी पायी दिंडी सोहळ्याची माहिती दिली.