टिटवाळ्यात भाजपाच्या सदस्य अभियानास उदंड प्रतिसाद
भाजपा बनवणार सदस्यांचा विक्रम
राजू टपाल.
टिटवाळा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर संघटन पर्व सदस्यता अभियान सुरु आहे. सदस्य होण्यासाठी मिस्ड कॉल द्या आणि सदस्य व्हा अशी भाजपने मोहीम राबवली आहे.
मांडा टिटवाळा येथे भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस परेश गुजरे
यांच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी अभियान
राविण्यात आले.
सदरील अभियानास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत आपली सदस्य नोंदणी केली. यावेळी अनेक युवक, महिला, शेतकरी, उद्योजक, आणि वंचित घटकांना भाजपच्या विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदस्यता अभियानात आधुनिक स्वरूप देत भाजपने डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला आहे.
पक्षाचा प्रसार ग्रामीण भागात अधिक दृढ करणे, तरुण मतदारांना आकर्षित करणे, आणि महिला सबलीकरणाच्या दृष्टीने त्यांचा पक्षात सहभाग वाढवणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मोबाइल ऍप, वेबसाइट आणि डिजिटल मंचांच्या माध्यमातून इच्छुक नागरिकांना घरबसल्या सदस्य होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी स्वतः या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, "सदस्यता अभियान केवळ पक्षाचा विस्तार करण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे
अभियानाचा समारोप १५ जानेवारी रोजी होणार असून, त्याआधीच विक्रमी सदस्यता मिळवण्याचा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
सदर सदस्यता नोंदणी वेळी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर,मोहने मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर,वार्ड अध्यक्ष दीपक कांबळे, किरण गुजरे, कौस्तुभ गुजरे, भूषण बापट, साई दत्ता, विजय हिंदुराव, शैलेश देशपांडे, विनोद इंगळे, अक्षय कळसकर, प्रथमेश गुजरे यांसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्ये उपस्थित होते.