फटाके फोडत असताना जवळील पत्रा उडून 20 वर्षीय तरूणाचा मृत्यू ; शिरूर येथील घटना
फटाके फोडत असताना जवळील पत्रा उडून गळ्याला लागल्याने २० वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवार दि.४ नोव्हेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
रोहन अनिल मल्लाव वय २० वर्षे रा.काची आळी शिरूर जि.पुणे असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
शिरूर शहरातील काची आळीतील रहिवासी असलेला मृत रोहन गुरूवरी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मित्रांसोबत फटाके फोडत होता. यावेळी एक अँटमबाँम्ब फुटला. त्याजवळ पडलेला पत्र्याचा एक तुकडा थेट रोहनच्या गळ्यावर येवून आदळला. यामध्ये रोहनचा पुर्ण जबडाच कापला गेला. रक्तबंबाळ झालेला रोहन क्षणार्धात जमिनीवर कोसळला. याठिकाणी उपस्थित असलेल्या अन्य तरूणांनी रोहनला तातडीने जवळच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी रोहनची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.