फी साठी पैसे मागितल्याच्या कारणावरून पत्नीला विहीरीत ढकलले ; मंचर - घोडेगाव रस्त्यावरील घटना
फी साठी पैसे मागितल्याच्या कारणावरूध पत्नीला विहीरीत ढकलल्याची घटना मंचर - घोडेगाव रस्त्यावर घडली.
पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल श्रीराम राठोड याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वनिता राठोड महिलेचा पती अनिल राठोड हा एका महाविद्यालयात असिस्टंट म्हणून काम करतो. पत्नीने त्याच्याकडे आवश्यक असलेली फी मागितली. पती अनिल राठोड याने पैसे देण्यास नकार दिला. माहेरून पैसे घेवून ये असे तो म्हणाला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. पत्नीने एक तर तुम्ही मला पैसे द्या किंवा माहेरी नेऊन सोडा असे सांगितले. त्यानंतर माहेरी सोडतो असे सांगून दोघेही घराबाहेर पडले.गोड बोलून अनिल राठोड यांनी पत्नीला मंचर - घोडेगाव रस्त्यावर नेले.कोणीही नसल्याचे पाहून एका विहीरीत ढकलून दिले. सुदैवाने फिर्यादी वनिता राठोड वय -२४ या घटनेतून बचावल्या.