• Total Visitor ( 133272 )

अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग

Raju tapal February 28, 2025 23

अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग;
सर्व खलाशी सुखरूप 

अलिबाग:-रायगडमधील अलिबाग जवळ समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भर समुद्रात बोटीने पेट घेतला आहे. या आगीत बोट ८० टक्के जळून खाक झाली आहे. बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. बोटीवर १८ ते २० खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप आहेत. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखर आक्षी गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे.  दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणली आहे. सध्या आग विझविण्याचं काम सुरु आहे. साखर आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान इलेक्ट्रिक शॉक सर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मदतीला कोस्ट गार्ड व नेवीच्या बोटी मदतीला पोहोचलेल्या असून सर्व खलाशी सुरक्षित आहेत.
 

Share This

titwala-news

Advertisement