फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
Raju Tapal
May 20, 2022
31
कामानिमित्त मूळगावी गेलेल्या व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना आळेफाटा येथील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत घडली.
संतोष तुळशीराम शेलार यांनी या घटनेबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आळेफाटा पोलीसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
आळेफाटा येथील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत राहणारे संतोष शेलार १७ /०५/२०२२ रोजी संगमनेर तालुक्यातील अकलापूर या मूळगावी कुटूंबासोबत गेले होते.
चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप कापून आत प्रवेश केला.
बेडरूमच्या कपाटातून २ लाख रूपये किंमतीच्या ५ अंगठ्या, १ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन ,दीड लाख रूपये किंमतीचे कानातील डूल, अडीच लाख रूपये किंमतीचे दोन नेकलेस असा एकूण ७ लाख रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करत आहेत.
Share This